ANI
महाराष्ट्र

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर ; गटातील आमदारपुत्रांचा प्रामुख्याने समावेश

शिवसेनेवर दावा केल्यानंतर आता शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवासेनेवरही दावा केला आहे

प्रतिनिधी

शिवसेनेत बंड केल्यानंतर आता शिंदे गटाने युवासेनेला देखील लक्ष्य केले आहे. शिवसेनेवर दावा केल्यानंतर आता शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवासेनेवरही दावा केला आहे. युवासेनेची नवी कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या पुत्रांचा समावेश आहे. यातील अनेक जण हे आधी आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेतच कार्यरत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंड केले. त्यांच्यासोबत ४० आमदार व १२ खासदारही गेले. खरी शिवसेना आमचीच, असा दावा शिंदे गटाने केला असून दसरा मेळावा देखील आयोजित केला आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेलाही शिंदे गटाने लक्ष्य केले आहे. युवासेनेची नवी कार्यकारिणी शिंदे गटाने जाहीर केली आहे.

शिंदे गटाने युवा सेनेच्या कार्यकारिणीत बंडखोर आमदार पुत्रांना प्रामुख्याने स्थान दिले आहे. त्यात दादा भुसे, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, दिलीप लांडे, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे आदींच्या पुत्रांचा कार्यकारिणीत समावेश आहे. हे आमदार पुत्र आजपर्यंत आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करत होते.

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी

व्यावसायिक एलपीजी १८३ रुपयांनी कमी, पुरवठाही सुरळीत