महाराष्ट्र

'दादर-पंढरपूर रेल्वे' गाडीचा साताऱ्यापर्यंत विस्तार

Swapnil S

कराड : मध्य रेल्वेच्या वतीने पुणे,कुर्डुवाडी मार्गे सध्या सुरू असलेल्या मुंबई (दादर) ते पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीचा साताऱ्यापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी कराड, साताऱ्यातील प्रवाशांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीकाँग्रेसचे खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे वारंवार केली होती. खा. पाटील यांनीही याबाबत रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहत पानवे यांच्यासह मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्याव्यवस्थापक इंदू दुबे आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर या मागणीचा विचार करून त्यानुसार या गाडीचा विस्तार साताऱ्यापर्यंत करण्यात आल्याची माहिती कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी येथे दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई (दादर) येथून पंढरपूरला रेल्वे गाडी सुरू आहे; मात्र ही गाडी सोलापूर, कुर्डुवाडीमार्ग पंढरपूरला जाते, त्यामुळे साताऱ्यासह सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांना त्याचा काहीच उपयोग नव्हता तर या दोन्ही जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी एकाही थेट गाडीची सोय नाही. त्यामुळे या तालुक्यांतील रेल्वे प्रवाशी,नोकरदार,विद्यार्थी, कामगार आदींनी सातारा-पंधरा7गाडीची मागणी वारंवार उचलून धरली होती; मात्र त्याला रेल्वे प्रशासनाने नेहमी केराचीच टोपली दाखवली होती. अखेर खा. पाटील यांनीही रेल्वे मंत्री व राज्यमंत्र्यांकडे पत्रांद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला होता, तर कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणेविभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनीही सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी वारंवार केली होती. याची रेल्वे प्रशासनाने दाखल घेत सदर गाडीचा साताऱ्यापर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस