'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे प्रकल्प पेटंटमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण

उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन, नवसंशोधन (इनोव्हेशन) आणि बौद्धिक संपदा निर्मितीला चालना देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी’ने (एमएसईडीए) तीन दिवसांच्या राज्यस्तरीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

FPJ News Service

एफपीजे न्यूज सर्व्हिस/मुंबई

उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन, नवसंशोधन (इनोव्हेशन) आणि बौद्धिक संपदा निर्मितीला चालना देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी’ने (एमएसईडीए) तीन दिवसांच्या राज्यस्तरीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आळंदी येथील ‘एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग’ येथे ‘प्रोजेक्ट टू प्रॉडक्ट टू पेटंट्स’ ही कार्यशाळा पार पडली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश प्राध्यापकांना शैक्षणिक प्रकल्पांचे रूपांतर उत्पादनांमध्ये व पेटंटयोग्य नवकल्पनांसाठी कौशल्यांनी सुसज्ज करणे हा होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील अनुभवात्मक आणि प्रकल्प-आधारित शिक्षणावर यात भर देण्यात आला होता.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या एकूण ४० प्राध्यापकांनी सहभाग घेतला. यामध्ये वास्तविक जीवनातील समस्या शोधणे, त्यांच्या मूळ कारणांचे विश्लेषण करणे, उत्पादनाची डिझाईन, प्रोटोटाइप विकसित करणे, तसेच बौद्धिक संपदा अधिकार आणि पेटंट नोंदणी या संपूर्ण नवसंशोधन चक्राचा समावेश होता. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

नवसंशोधन साधनांची ओळख

सहभागी प्राध्यापकांना ‘फिशबोन डायग्राम’, ‘स्कॅम्पर’ आणि ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’ यांसारख्या नवसंशोधन साधनांची ओळख करून देण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धन, हरित कॅम्पस आणि विज्ञान आश्रमाच्या ‘करून शिका’ (लर्निंग बाय डुइंग) या संकल्पनेवरही चर्चा करण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम