devendra fadnavis FPJ
महाराष्ट्र

बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही! फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

शिवसेनेच्या ५९व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शैलीत भाजपचा खरपूस समाचार घेतला. ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशाण मिटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Swapnil S

मुंबई : शिवसेनेच्या ५९व्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शैलीत भाजपचा खरपूस समाचार घेतला. ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशाण मिटवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बोलबच्चन भैरवींना उत्तर देत नाही, या अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

शिवसेना संपली नाही, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तर ‘सेना’ गमावली, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभ सोडून उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या चरणी नतमस्तक झाले, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात - बावनकुळे

ठाकरे गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीने ओकलेली हतबलता होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच त्यांनी केल्याचे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बावनकुळे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video