महाराष्ट्र

"लाडकी बहीण योजनेचा उल्लेख कराल, तर..."; नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजप आमदाराला सुनावले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत आमदारांना कठोर शब्दात तंबी दिली. "योजनेचा विनाकारण उल्लेख केला तर घरी बसावे लागेल," असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

किशोरी घायवट-उबाळे

राज्यात सोमवार (दि.८) पासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज (दि.९), अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी तसेच भाजप आमदाराने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा उल्लेख केला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत आमदारांना कठोर शब्दात तंबी दिली. "योजनेचा विनाकारण उल्लेख केला तर घरी बसावे लागेल," असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही राज्य सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही योजना नेहमीच चर्चेत आली आहे. कधी महिन्याच्या हप्त्यांवरून तर कधी योजना बंदच होईल, या मुद्द्यावरून. आता या योजनेची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून.

...नाहीतर घरी बसावे लागेल

लाडकी बहिण योजनेचा विरोधकांनी वारंवार उल्लेख केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची दखल घेतली. "लाडकी बहीण योजनेचा संदर्भ कशाशीही जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल," असा सूचक इशारा फडणवीसांनी मंगळवारी (दि.९) दिला.

ही योजना सुरूच राहणार

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची तुलना कोणत्याही गोष्टींशी करू नका. ही योजना सुरूच राहणार आहे." असे विधानसभेत फडणवीसांनी सूचित केले.

भाजप आमदारालाही सुनावले

भाजप आमदार अभिमन्यू पवार हे पूर्वी फडणवीसांचे वैयक्तिक सहाय्यक होते. त्यांनी कथित अवैध दारू वितरणाच्या मुद्द्यावर बोलताना लाडकी बहीण योजनेचा संदर्भ दिला. यावेळी तत्काळ हस्तक्षेप करत फडणवीसांनी स्पष्ट केले की, “मी आधीच सांगितले आहे, असंबंधित विषयांमध्ये या योजनेचा उल्लेख करू नका. हे सर्वांनाच लागू आहे.”

यापूर्वी काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनीही अन्य मुद्द्यावर बोलताना या योजनेचा उल्लेख केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिल्यांदा नाराजी दर्शवली होती.

योजनेची खिल्ली उडवू नका

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही राज्याची महत्त्वाची योजना आहे. तिचा वापर राजकीय टोमणे मारण्यासाठी किंवा असंबंधित चर्चांमध्ये करू नये. ही योजना सुरूच राहील. कोणत्याही इतर योजनांचे निधी किंवा कामकाज यातून प्रभावित होणार नाही. पण अनावश्यक टिप्पणी आम्ही सहन करणार नाही.”

त्यानंतर उर्वरित प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही आमदाराने या योजनेचा उल्लेख केला नसल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 'मिसिंग लिंक': सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आता नवा सामना; रोड केबल-स्टेड ब्रिजसाठी आव्हानात्मक अभियांत्रिकी काम

Goa Nightclub Fire Update : नाईटक्लबच्या अग्नितांडवानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; ‘रोमिओ लेन’वर बुलडोझर

संतोष देशमुख हत्येला एक वर्ष: आईला हुंदका अनावर; 'आता कोणत्या देवाला साकडं घालावं?' म्हणत लेकरासाठी न्यायाची मागणी

"आम्ही घरातच शत्रू..."; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवरून महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Phaltan Doctor Suicide: महिला डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर तिचेच; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत मोठा खुलासा