पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बनावट पदवीचे एक धक्कादायक रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस आले असून यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील एका सहाय्यक कक्षाधिकाऱ्याने रिक्षाचालकाच्या मुलाला चक्क कोणतीही परीक्षा न देता तीन लाख रुपयांच्या बदल्यात बीकॉमची पदवी देण्याचे ओकाचा दावा मिळवून काणचे सतर्क रिक्षाचालकाने पुराव्यांसह तक्रार दिल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने चौकशीसाठी सत्यशोधन समिती नियुक्त केली आहे. या प्रकरणाच्या रिक्षाचालक महेश कदम हे मुलगा साहील कदम याच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी पुणे विद्यापीठात गेले होते. त्यावेळी त्यांची भेट वित्त व लेखा विभागातील सहाय्यक कक्षाधिकारी रमेश मुखेकर यांच्याशी झाली. मुखेकर व त्यांच्या ३ ते ४ सहकाऱ्यांनी कदम यांना मुलाला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश न घेता किंवा कोणतीही परीक्षा न देता थेट बीकॉमची डिग्री मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जुन्या नावाने दिली प्रमाणपत्रे
जेव्हा कदम यांना ही प्रमाणपत्रे दाखवण्यात आली, तेव्हा त्यांना या संपूर्ण व्यवहाराबाबत संशय आला. २०१४ मध्ये पुणे विद्यापीठाचा नामविस्तार होऊन 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे नाव झाले असतानाही, मुखेकर यांनी दिलेल्या पदवी प्रमाणपत्रावर जुन्या 'पुणे विद्यापीठ' या नावाचा उल्लेख होता.
समिती दोन दिवसांत अहवाल देणार
प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली असून पुढील दोन दिवसांत तिचा अहवाल अपेक्षित आहे.