महाराष्ट्र

तोतया आयपीएस अधिकाऱ्यास अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

अंबर दिव्याची इनोव्हा कार, अंगावर आयपीएस अधिकाऱ्याची वर्दी, त्यावर इंग्लिशमध्ये लिहलेली 'आयपीएस'ची अक्षरे, हातात महागडी बॅग अन डायरी या थाटात वावरणाऱ्या 'तोतया' आयपीएस भामट्याच्या कारनाम्यांचा कराड पोलिसांनी चांगलाच पर्दाफाश केला.

Swapnil S

कराड : अंबर दिव्याची इनोव्हा कार, अंगावर आयपीएस अधिकाऱ्याची वर्दी, त्यावर इंग्लिशमध्ये लिहलेली 'आयपीएस'ची अक्षरे, हातात महागडी बॅग अन डायरी या थाटात वावरणाऱ्या 'तोतया' आयपीएस भामट्याच्या कारनाम्यांचा कराड पोलिसांनी चांगलाच पर्दाफाश केला. यामध्ये त्याने नोकरीचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुमारे दीड ते दोन कोटींना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहेत.

श्रीकांत विलास पवार (३६) असे नाव सांगत असलेला सदर संशयित आपण आयपीएस अधिकारी असल्याची बनवेगिरी करून कराड परिसरातील तरुणांना शासकीय नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोंना गंडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याप्रकरणी श्रीकांत विलास पवारला कराड शहर पोलिसांना मिळाली आणि या कथित आयपीएसला पोलिसांनी अटक केली. तोतया आयपीएसला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आतापर्यंत प्रारंभी ४० लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. एका युवतीसह एका युवकाने सहा लाख आणि सात लाखांची फसवणूक या भामट्याने केल्याची तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्याकडे दिली आहे. जत परिसरातही याने अनेकांना गंडा घातला असून यातही २९ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.

पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात २०१५ साली या संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या भामट्याने परजिल्ह्यातील अनेकांना लाखोंचा गंडा घातली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकारचा निर्णय : ‘संचार साथी’ ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉल करण्याचा निर्णय मागे!

रोहित पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेचं केलं स्वागत, पण फडणवीसांवर टीका; म्हणाले - "एकीकडं ठेकेदारांचं बिऱ्हाड..."

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेची विशेष व्यवस्था; १२ अतिरिक्त गाड्यांची घोषणा, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

मुंबई-पुणे सोडून थेट बहरीन! जय पवार-ऋतुजा पाटील यांचं शाही लग्न; ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी ४०० पाहुण्यांमध्ये NCP चे केवळ २ नेते

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल