मराठी मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र विजय चव्हाण यांनी दिली आहे.
लावणी आणि सुलोचना ताईंचे नाते वेगळे होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी लावणी गाऊन प्रेक्षकांमध्ये स्वतःची एक वेगळीच छाप पाडली. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी ३ वाजता मरीन लाइन्स स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 60 वर्षांहून अधिक काळ मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. याशिवाय काही शस्त्रक्रिया आणि वाढत्या आजारामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.