पेण : गेली सुमारे १७ वर्षे काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील कोकणवासीय या उत्सवासाठी आपल्या गावी जातात. त्यातच रखडलेल्या कामांमुळे तसेच महामार्गावर खड्डेही खूप असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. त्यात मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यात आला होता. हे दोन्ही महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचअनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सकाळी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधील कामांची पाहणी केली. फडणवीस सरकारच्या काळातही चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाममंत्री असताना कंत्राटदारांना वेगवेगळ्या मुदती दिल्या जात होत्या. शिवाय, निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी वेळोवेळी दिला. पण प्रत्यक्षात मात्र या महार्गाची स्थिती बदलली नाही. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहणीनंतर, निवडणुकीच्या तोंडावर तरी प्रवास काही प्रमाणात सुखकर होईल, अशी कोकणवासीयांना आशा आहे. तरीही महामार्ग नेमका केव्हा पूर्णत्वास जाईल ? हे मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
नितीन गडकरींच्या दाव्याचे काय झाले?
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न समस्त कोकणवासीयांना पडला असतानाच, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मे महिन्यात याची तारीख जाहीर केली होती. जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा महामार्ग तयार होणार असल्याचा दावा त्यांनी उत्तर मध्य मुबंईतील महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्या प्रचारसभेत केला होता. चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई- गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जून अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर मुंबईतून गोव्याला पोहोचणे पाच तासांत शक्य होणार आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे, हे उल्लेखनीय ! : गेली सुमारे १७ वर्षे काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील कोकणवासीय या उत्सवासाठी आपल्या गावी जातात. त्यातच रखडलेल्या कामांमुळे तसेच महामार्गावर खड्डेही खूप असल्याने गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. त्यात मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यात आला होता. हे दोन्ही महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचअनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सकाळी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधील कामांची पाहणी केली. फडणवीस सरकारच्या काळातही चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाममंत्री असताना कंत्राटदारांना वेगवेगळ्या मुदती दिल्या जात होत्या. शिवाय, निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तसेच कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी वेळोवेळी दिला. पण प्रत्यक्षात मात्र या महार्गाची स्थिती बदलली नाही. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहणीनंतर, निवडणुकीच्या तोंडावर तरी प्रवास काही प्रमाणात सुखकर होईल, अशी कोकणवासीयांना आशा आहे. तरीही महामार्ग नेमका केव्हा पूर्णत्वास जाईल ? हे मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
नितीन गडकरींच्या दाव्याचे काय झाले?
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न समस्त कोकणवासीयांना पडला असतानाच, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मे महिन्यात याची तारीख जाहीर केली होती. जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा महामार्ग तयार होणार असल्याचा दावा त्यांनी उत्तर मध्य मुबंईतील महायुतीचे उमेदवार उज्वल निकम यांच्या प्रचारसभेत केला होता. चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई- गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जून अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर मुंबईतून गोव्याला पोहोचणे पाच तासांत शक्य होणार आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे, हे उल्लेखनीय !
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळी फित दाखवून निषेध
अलिबाग : अवघ्या काही दिवसांत गणरायाचे आगमन होणार आहे. असे असताना भाजप-शिंदे सरकारला दुरवस्था झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आताच वेळ मिळाला का..? अजूनपर्यंत झोपून राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महामार्ग पाहणीच्या नौटंकीचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि संपर्कप्रमुख विष्णु पाटील यांनी निषेध आंदोलन केले. सोमवारी महामार्गावरील पेण-वाशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळ्या फिती दाखवण्यात आल्या. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोयनाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यावेळी संपर्क प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना वक्ते धनंजय गुरव, विभाग प्रमुख गिरीश शेळके, चंद्रहार पाटील व जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, जिल्हा समनवयक नरेश गावंड, पेण तालुका प्रमुख जगदिश ठाकूर, अलिबाग-पेण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.