महाराष्ट्र

अवयव विक्रीचं रेटकार्ड घेऊन शेतकरी ठाकरे दरबारी; उद्धव ठाकरेंनी केली थेट कर्जमाफीची मागणी

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली

नवशक्ती Web Desk

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडकुंडीस आणलं आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील अनेक भागात आलेल्या वादळी पावसाने आणि काही भागात झालेल्या गारपीटीमुळे फळ बागा, कापूस, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्षांचं तर कोकणात आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून शासनदरबारी मदतीची मागणी केली जात आहे. दरम्यान, आज या बिकट परिस्थितीत आज हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी या शेतकऱ्यांकडून त्यांच्या भावना व्यक्त केल्या गेल्या. राज्यातील शेतकरी हा अडचणीत आहे. हे शेतकरी स्वत:ताचे अवयव विकण्यासाठी आले होते. सोयाबिन उद्धवस्थ झालं. कापूस गेला आता पिककर्ज भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आम्ही आमचजे अवयव विकायला काढलेत सरकारने अवयव विकत घ्यावे आणि आमची कर्जफेड करावी, अशी आर्तहाक यावेळी या शेतकऱ्यांनी घातली.

या पत्रकार परिषदेत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या अवयवांचा रेटकार्ड जाहीर केला. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे कर्जाचे नियोजन सरकारने करावं, अशी मागणी यावेळी केली. सरकारने विमा कंपन्यांच्या डोक्यावर ८ हजार कोटी घातले. १ रुपयाला विमा दिला होता. तो विमा कुठं आहे, कुणाला मिळाल? आता नुकसान भरपाई, पंचनामे थांबवा आणि शेतकऱ्यांना सरळ कर्जमुक्ती द्या. ही शिवसेनेची मागणी आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुका असलेल्या पाच राज्यातील गॅस सिलिंडरचे भाव मतदान झाल्यानंतर परत वाढले आहेत. एवढा खोटारडेपणा यापूर्वी कधी झाला नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांनी सरकारला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली असल्याचंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी