महाराष्ट्र

नव्या मंत्र्यांना वास्तुदोषाची भीती; कार्यालयातील अंतर्गत रचनेत बदल, मजले बदलले

महायुतीच्या मंत्र्यांना बंगले, मंत्रालयात दालन वाटप करण्यात आले. मात्र दालन उपलब्ध झाल्यानंतर कार्यालयात वास्तुदोषाच्या भीतीपोटी अनेक मंत्र्यांनी आपल्या दालनात अंतर्गत रचनेत बदल केले, तर काही मंत्र्यांनी मजलेही बदलले.

गिरीश चित्रे

महायुतीच्या मंत्र्यांना बंगले, मंत्रालयात दालन वाटप करण्यात आले. मात्र दालन उपलब्ध झाल्यानंतर कार्यालयात वास्तुदोषाच्या भीतीपोटी अनेक मंत्र्यांनी आपल्या दालनात अंतर्गत रचनेत बदल केले, तर काही मंत्र्यांनी मजलेही बदलले. महायुतीतील मंत्र्यांनी आपल्या दालनात विधिवत पूजाअर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे कारण देत सहाव्या व सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे कार्यालय बंदिस्त करण्यात येत असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

अधिवेशनाच्या अखेरीस खाते वाटप जाहीर करण्यात आले. खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांना बंगले आणि मंत्रालयात दालन उपलब्ध करण्यात आले. मात्र मंत्रालयात दालन उपलब्ध झाल्यानंतर काही मंत्र्यांनी दालन घेण्यास नकार देत याच मजल्यावर दालन पाहिजे, अशी सेटिंग वरिष्ठांकडे लावली. यात राज्यमंत्री ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल यांना मंत्रालयातील विस्तारीत इमारतीतील सहाव्या मजल्यावरील दालन क्रं. ६२६ ते ६२८ (मुख्य व विस्तार इमारतीस जोडणारा ब्रिज), ६ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत तसेच राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांना विधान भवनातील दालन क्रं ११७ व १२२ वाटप करण्यात आले होते. मात्र दोन्ही राज्यमंत्र्यांनी हरकत घेतल्याने प्रधान सचिव (विमान चालन व राज्य उत्पादन शुल्क) यांना वाटप करण्यात आलेले दालन क्र.३१७, ३१९, ३२१ आता अॅड. आशिष उमा देवी नंदकिशोर जयस्वाल यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.तसेच योगेश ज्योती रामदास कदम यांना मंत्रालयातील विस्तारित इमारतीतील सहाव्या मजल्यावरील दालन क्रं. ६२६ ते ६२८ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय बंदिस्त 

अडीच वर्षें मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाकला. या अडीच वर्षांच्या काळात एकनाथ शिंदे यांचा जनसंपर्क वाढला. एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी राज्यभरातून लोक मंत्रालयात धाव घेत होते. एकनाथ शिंदे यांची जनमानसात वाढती लोकप्रियता लक्षात घेता आता उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांना सहाव्या मजल्यावर तसेच अजित पवार यांनाही सहाव्या मजल्यावर दालन उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र आता सुरक्षेचे कारण देत सहाव्या व सातव्या मजल्यावरील कार्यालय बंदीस्त करण्यात येत असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. 

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड