महाराष्ट्र

राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती ; राज्य सरकारची आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत जाहीर

नवशक्ती Web Desk

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून यामुळे शेतकरी वर्गाचं आणि इतर लहान मोठ्या उद्योगांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्यसरकार या आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असून शासनाकडून त्यांना मदत केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान विधानपरिषदेमध्ये निवेदन जारी करत अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं असून त्यांना मदत करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले की, 23 जुलै रोजी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले.

विर्भातील बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या भागात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याठिकाणी स्वतः जाऊन मंत्र्यांनी भेटी दिल्या. बचाव पथकांच्या माध्यमातून ११० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. काही ठिकाणी वायूदलची देखील मदत घेण्यात आली. मुसळाधार पवासामुळे पाण्याचा पातळीत अचानक वाढ झाली यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद होऊन माणसे अडकली होती. अशा ठिकाणीं बचाव करत 30 लोकांना वाचवण्यात आलं. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणीं 20 ते 25 लोक अडकली होती त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ यांची मदत घेण्यात आली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

या पूरपरिस्थीत मृत्यूमुखी पडलेल्यांना तसंच नुकसान ग्रस्तांनी अजित पवार यांनी मदत जाहीर केली आहे. बोलताना अजित पवार म्हणाले की, या पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तर ज्यांच्या घरात पाणी शिरुन संसार उघड्यावर पडला आहे त्यांना राज्य सरकारकडून १० हजाराची मदत करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके

ठाणे स्थानकात उद्या रात्री ६ तासांचा पॉवर ब्लॉक, रात्री १०.३० ते पहाटे ४.३० पर्यंत गर्डर बसविण्याचे काम

सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनल हॅक; 'हे' Video केले अपलोड

जालन्यात एसटी बस-टेम्पोचा भीषण अपघात; बसच्या वाहकासह सहा जण ठार, १७ जखमी