महाराष्ट्र

केरळमध्ये फुटबॉल स्टेडियम कोसळले २०० जण जखमी

वृत्तसंस्था

वंदूर जिल्ह्यातील मलाप्पूरम येथील पुंगूड येथे फुटबॉल सामन्यादरम्यान उभारण्यात आलेली गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत जवळपास २०० लोक जखमी झाले असून पाच गंभीर जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी फुटबॉलचा सामना सुरू होण्याआधीच हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्यातील मलाप्पूरममधील पुंगुड येथे दोन संघादरम्यान फुटबॉलचा अंतिम सामना खेळवला जाणार होता. हा सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने प्रेक्षक जमले होते. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली होती. शनिवारी सामना सुरू होण्यापूर्वी पूर्ण गॅलरी प्रेक्षकांनी गच्च भरली होती. मात्र सामना सुरु होण्याआधी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही गॅलरी कोसळली.

या अपघातात गॅलरीवर बसलेले शेकडो प्रेक्षक खाली कोसळले. यामध्ये एकूण २०० च्या आसपास लोक जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुटबॉलचा अंतिम सामना पाहण्यासाठी तब्बल दोन हजार लोक जमले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गॅलरी पूर्ण भरल्यानंतरही कार्यक्रमानंतर आयोजकांनी पाहुण्यांची ये-जा थांबवली नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदानानंतर लगेच पुसली जाते बोटावरची शाई; मनसेच्या महिला उमेदवाराचा दावा; काँग्रेसच्या सचिन सावंतांनी तर प्रात्यक्षिकच दाखवलं - Video

BMC Elections 2026: 'व्होटर स्लिप्स'चा गोंधळ; अनेक मतदार मतदान न करताच परतले

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?