महाराष्ट्र

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका ; तातडीने रुग्णालयात दाखल

केंद्रीय मंत्री निती गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले असता जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला

नवशक्ती Web Desk

कन्नड-सोयगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवधन जाधव यांना हृदयविकाराचा सोम्य झटका आला आहे. केंद्रीय मंत्री निती गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले असता जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृतीस्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला होता.

मनसेचे सुरुवातील निवडून आलेल्या १३ आमदारांमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा समावेश होता. त्यांनतर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवत कन्नड मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. यानंतर शिवसेनेवर आरोप करत रायभान जाधव यांच्या नावाने पत्र काढत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी मोठ आवाहन उभ केलं होतं. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मोठ मताधिक्य मिळालं होते. तसंच त्यांच्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना देखील पराभवाला सामोरे जाव लागलं होतं.

सरकारी जमिनीवर मालकी नोंदवणाऱ्यांना दणका; भाडेपट्टा नोंदीवर आता ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार

Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील ‘नॉईज बॅरिअर’ कोसळले; उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच दुर्घटना

रेरा कायदा कंत्राट कायद्यापेक्षा अधिक प्रभावी; घराचा ताबा देण्यास उशीर झाल्यास खरेदीदाराला दरमहा व्याज दिलेच पाहिजे, HC चा विकासकाला झटका

निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ ॲप

BEST संपाने मुंबईकरांचे हाल! केवळ ४८ बसेस रस्त्यावर