महाराष्ट्र

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन ; पाथर्डीतील पिंपळगाव पागोरी येथे होणार अंत्यसंस्कार

बबनराव ढाकणे हे गेल्या तीन आठवड्यापासून न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

नवशक्ती Web Desk

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे गेल्या तीन आठवड्यापासून न्युमोनिया आजारानं ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आहे. यात त्यांचं निधन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ढाकणे हे चार वेळा आमदार तर एकवेळा खासदार होते. त्यांनी राज्यात तसंच केंद्रात मंत्रीपदं भूषवलं होतं. त्यांचं पार्थिव आज अहमदनदरच्या पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहात आज दुपारी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ साली महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. जनता दलातर्फे बीड लोकसभेतून ते निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जामंत्री होते.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार