महाराष्ट्र

पिसोरी हरणाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक; महाबळेश्वरमध्ये स्थानिकांच्या जागरूकतेमुळे झाला पर्दाफाश

Swapnil S

कराड : महाबळेश्वर ते कास दरम्यान काही शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारीच्या साहित्यांसह आले असून, त्यांनी तेथे जंगलात आढळणारी अत्यंत दुर्मिळ प्रजातीतील पिसोरी हरणाची शिकार केल्याची माहिती तेथील स्थानिक लोकांनी महाबळेश्वर व जावळी(मेढा) वन विभागाला दिल्यानंतर या दोन्ही वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी पथके तयार करून साफळा रचला असता, या वनक्षेत्रात दोन व्यक्ती शिकारीच्या साहित्यांसह असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी व तपास केला असता, त्यांच्याजवळ वन्य प्राणी पकडण्याची वाघर, कोयता, बंदूक, काडतुसे व शिकारीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यांसह शिकार केलेले पिसोरी हरीण, त्यांचे मांस आदी आढळून आले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांच्याबरोबर शिकारीसाठी आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वन विभागाच्या पथकांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना घेऊन अन्य संशयितांचा शोध घेतला असता दोघेजण निष्पन्न झाले. त्यांची अधिक चौकशी केली त्यांच्याकडील पिशव्यांमध्ये शिकार केलेले मृत पिसोरी हरीण व त्यासाठी वापरलेली गावठी बंदूक व इतर साहित्य आढळून आल्याने ते सर्व साहित्य वन विभागाने जप्त केले. या टोळीमध्ये आरोपी शिवाजी चंद्रकांत शिंदे, दीपक शंकर शिंदे, आदित्य दीपक शिंदे व गणेश कोंडिबा कदम यांचा समावेश असल्याने या आरोपींना वनविभागाने ताब्यात घेत त्या चारही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९ ,३९, ५०, ५१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वरील चौघांना वन विभागाने अटक केली असून, त्यांना महाबळेश्वरच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी वन कोठडीत करण्यात आली आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल