महाराष्ट्र

तोरणमाळ येथे अपघातात चौघांचा मृत्यू

मॉगोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे हे वाहन जात होते. यावेळी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावरून गाडी ही खोल दरीत कोसळली.

Swapnil S

नंदुरबार : जिल्ह्यातील तोरणमाळ येथे प्रवासी वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मॉगोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे हे वाहन जात होते. यावेळी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावरून गाडी ही खोल दरीत कोसळली. यामुळे हा मोठा अपघात झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत मृतदेह बाहेर काढले आहेत. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय