Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलणे बंद करावे, अशी धमकी आरती मारणे यांनी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय...
Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल
Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात शुक्रवारी (दि. २०) रात्री महिलांमध्ये जोरदार वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना आरती मारणे यांच्यासह चार महिलांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोशल मीडियावर केलेल्या टीकेतून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी रेखा कोंडे यांच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिसांनी चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर वाद

मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता ही घटना घडली. मारुतीराव डोंगरे प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रेखा कोंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल
Pune : भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

कार्यक्रम संपल्यानंतर त्या सभागृहातून बाहेर पडत असताना आरती मारणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी त्यांना अडवून जाब विचारल्याचा आरोप आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर केलेल्या टीकेवरून रेखा कोंडे आणि आरती मारणे यांच्यात आधीपासूनच वाद होता. याच कारणावरून त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे कोंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

केस ओढले, जमिनीवर पाडून फरफटत नेल्याचा आरोप

रेखा कोंडे यांच्या तक्रारीनुसार, आरती मारणे, त्यांची आई, मुलगी आणि बहीण पूनम दाभेकर यांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच केस ओढून जमिनीवर पाडले आणि फरफटत नेले. यावेळी संबंधित महिलांनी आपली साडीही ओढल्याचा आरोप कोंडे यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलणे बंद करावे, अशी धमकी आरती मारणे यांनी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, मारणे टोळीचा पाठिंबा असल्याचा दावा आरती मारणे यांनी केल्याचे कोंडेंनी म्हटले आहे. संबंधित महिलांनी रेखा कोंडे आणि त्यांच्या मुलीलाही इजा पोहोचवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

झटापटीत सोन्याचं मंगळसूत्र हरवलं

या झटापटीदरम्यान रेखा कोंडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून हरवल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रकार सुरू असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी केली आणि संबंधित महिलांना एकमेकींपासून दूर केले.

फेसबुकवरील व्हिडीओचाही तक्रारीत उल्लेख

रेखा कोंडे यांनी आपल्या तक्रारीत ३० ऑक्टोबर रोजी घडलेल्या आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. पूनम दाभेकर यांनी फेसबुकवर आपल्या चारित्र्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल
आई-वडील आक्रोश करत राहिले, पण...; रायगडमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकल्याने फुगा गिळलेल्या चिमुकल्याचा करुण अंत

या प्रकरणी रेखा कोंडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरती मारणे यांच्यासह चार महिलांविरोधात गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)