प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

पुणे, नाशिक येथील अपघातात चौघांचा मृत्यू

पुण्यात नगर-कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा येथे लक्झरी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला, तर नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळही बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता. या दोन अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

पुणे/नाशिक : पुण्यात नगर-कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा येथे लक्झरी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला, तर नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळही बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता. या दोन अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर दोन्हीही गाड्यांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, परंतु तोपर्यंत आगीत बस आणि कार जळून खाक झाली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

तसेच पुण्यातील नगर-कल्याण महामार्गावरही लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर- कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. आळे फाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसची समोरून येणाऱ्या कारला समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये, कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून रिया गायकर व कुसुम शिंगोटे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मध्य प्रदेशात परीक्षेदरम्यान आयएएस अधिकाऱ्याची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील गोकर्ण गुहेतून रशियन महिलेची सुटका

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद