गडचिरोली : जंगली हत्तीच्या हल्ल्यात एक ठार; Video (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
महाराष्ट्र

गडचिरोली : जंगली हत्तीच्या हल्ल्यात एक ठार; Video

गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तीने केलेल्या भीषण हल्ल्यात एका ३८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तीने केलेल्या भीषण हल्ल्यात एका ३८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्‍यांनी गुरुवारी या संदर्भातील माहिती दिली.

मेंढा गावचे रहिवासी असलेले धनराज मडावी हे बुधवारी संध्याकाळी ६:३० वाजताच्या सुमारास आपल्या काही साथीदारांसह सायकलने चांदालाकडे जाणार्‍या रस्त्यावरून घराकडे परतत होते. हत्तीला समोर पाहताच मडावी यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांनी आपल्या सायकली तेथेच टाकून सुरक्षित ठिकाणी पळ काढला, मात्र मडावी यांना वेळेत पळून जाण्यात यश आले नाही.

हत्तीने त्यांचा पाठलाग करून त्यांना आपल्या सोंडेत पकडले आणि जमिनीवर आपटून पायदळी तुडवले. या भीषण हल्ल्यात मडावी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग