महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; औरंगाबादमधील घटना

पीडित अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने ती गावातीलच शेतात मजुरी करते

वृत्तसंस्था

घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने शेतात मजुरीला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवत गावातीलच सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने ती गावातीलच शेतात मजुरी करते. सोमवारी दुपारी ती शेतात जात असताना सहा आरोपींनी तिला रस्त्यात अडवलं आणि निर्जन स्थळी नेत आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर आरोपी पीडितेला सोडून तिथून पसार झाले. भेदरलेल्या पीडितेला वेदना असह्य होत असल्याने तिने घर गाठत घडलेला प्रसंग आईला सांगितला. आईने क्षणाचाही विलंब नं करता पीडितेला सोबत घेत कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदविली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सर्व सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आरोपींनी यापूर्वी पीडितेची छेड काढत अत्याचार केले होते. मात्र, पीडितेने भीतीने ही बाब कुणालाही संगितली नव्हती. मात्र सहा नराधमाच्या अत्याचारानंतर असह्य वेदनेमुळे तिने हिंमत करत आईल घडलेला प्रकार सांगितला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार