महाराष्ट्र

गणपतीसाठी चाकरमान्यांची एसटीला पसंती; २०३१ जादा बसेस आतापर्यंत ‘फुल्ल’

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे.

Sagar Sirsat

मुंबई : बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. एसटी महामंडळाच्या १३०१ बसेस तसेच गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत.

मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी, वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी २०३१ बसेस फुल्ल झाल्या आहेत.

अर्थात, गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून २ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत.

गौरी-गणपती जादा वाहतूक

विभाग बुकिंग पूर्ण आरक्षित अंशत: आरक्षित एकूण

मुंबई ६२० १७४ ७३ ८६७

ठाणे २९४ ३१२ १०१ ७०७

पालघर ३८७ ६२ ८ ४५७

एकूण १३०१ ५४८ १८२ २०३१

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप