महाराष्ट्र

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Swapnil S

कराड : सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच त्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सुचिता उथळे (वय ५०), नीलम रेठरेकर (वय २६) अशी मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान, या वायू गळतीचे कारण समजू शकले नाही.

म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्यामुळे आग लागल्याने ९ कामगार आत अडकून पडले. या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देत सर्व प्रकारच्या मदतीबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

मुंबईत ९० हजार भटके कुत्रे, निवारा केंद्रे केवळ ८; BMC ची माहिती

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शरद पवार यांची चौकशीची मागणी

जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

'इंडिया' आघाडीला ६५ व्होल्टचा झटका बसणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला