महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नारायणगाव बायपासजवळ शनिवारी (दि. २०) सकाळी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना घडली.

नेहा जाधव - तांबे

नारायणगाव बायपासजवळ शनिवारी (दि. २०) सकाळी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना घडली. अचानक सुरू झालेल्या या गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली.

सकाळी अंदाजे १० वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या गॅस टँकरमधून सुरुवातीला थोड्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. काही वेळातच गळतीचा वेग वाढला आणि गॅस हवेत मोठ्या प्रमाणावर पसरला. घाणेरडा वास पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून टँकरचालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.

पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप गळतीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गळती थांबवण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू आहेत.

वाहतूक विस्कळीत, नागरिकांत भीती

पुणे-नाशिक जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गॅस गळती झाल्याने वाहनचालकांसह प्रवासी आणि आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अशा घटना वारंवार घडत असल्याने CNG आणि इतर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गळती थांबवण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल