महाराष्ट्र

"मुस्लिमांनाही ओबीसीमधून आरक्षण द्या..." मनोज जरांगेंची मागणी

Suraj Sakunde

जालना: राज्यातील आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी गेल्या काही काळापासून आंदोलन करत आहेत. तर त्याचवेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये, यासाठी 'ओबीसी आरक्षण बचाव' आंदोलन सुरु केलंय. हा वाद सुरु असतानाच आता मनोज जरांगेंनी मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे.

ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली काही काळापासून मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. त्याचवेळी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ नये, तसेच सगेसोयरेची मागणी पूर्ण होऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजानं आंदोलन उभं करून सरकारला दखल घ्यायला भाग पाडलं. त्यामुळं मनोज जरांगेंनी केलेली सरसकट आरक्षणाची मागणी मान्य होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं ओबीसी नेत्यांच्या या खेळीविरुद्ध जरांगेंनी मुस्लिम कार्ड खेळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मराठेच नाही, तर आता मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

जरांगे म्हणाले की, "मुस्लिम, लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, या सरकारी नोंदी आहेत. तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्यावरसुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे."

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था