महाराष्ट्र

सरकारला एकच संधी देतोय! उपोषणापूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा; मध्यरात्रीपासून उपोषणाला सुरुवात

पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

Swapnil S

पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. उपोषणाआधी त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिला आहे. आम्ही ठेवलेल्या मागण्यांची अंमलबजावणी लवकर करण्यात यावी. मराठा समाजाला राजकारणात उतरायचे नाही, पण तुम्ही = निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावाने आरडाओरड करायची नाही. त्यामुळे सरकारला एकच संधी देत आहे, - असा इशारा त्यांनी दिला आहे. "आम्हाला या आंदोलनातून कोणतेही राजकारण करायचे नाही. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. मागच्या उपोषणापर्यंत सरकार आमची दखल घेत होते. आता तुम्ही या अगर येऊ नका, आपण आपली प्रक्रिया राबवत असतो. कोणी आले म्हणून आंदोलन होत नसते. पण राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील," असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. "आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय. आमच्या नावाने नंतर तक्रार करू नका. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही राजकारण करू नये तर आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर नंतर आमच्या नावाने तक्रार करायची नाही," असे जरांगे-पाटील म्हणाले.

"आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. निवडणुकीशी आम्हाला देणेघेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, जरांगे-पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे," असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात फूट पाडणे हे त्यांचे काम !

आंदोलनात फूट पाडणे हे त्यांचे कामच आहे. आजही त्यांचे षडयंत्र चालूच आहे. पण मला आजपासून त्यावर बोलायचे नाही. आमचे ध्येय मराठा आरक्षण आहे. राज्यातला सगळा मराठा समाज कुणबी आहे. याला शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. तिन्ही गॅझेट तातडीने लागू करा. सरसकट गुन्हे मागे घेणे, आंदोलनातील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सरकारी नोकऱ्या या आमच्या मागण्या आधीच त्यांना दिल्या आहेत," असेही जरांगे यांनी सांगितले.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात