गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची गाजलेली निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रशासन काळातील तोटा भरून काढण्यासाठी आता गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची गाजलेली निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रशासन काळातील तोटा भरून काढण्यासाठी आता गोकुळच्या दूध दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपयांनी, तर गाईच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारपासून नवीन दर लागू होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध दूध संघांकडून दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ केली जात आहे. पशुखाद्य, चारा, वाहतूक आणि जनावरांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. दुसरीकडे, दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढत असताना शेतकऱ्यांना मिळणारा दर पुरेसा नसल्याची भूमिका दूध उत्पादकांकडून मांडली जात होती. त्यामुळे गोकुळच्या दूधदरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर गोकुळच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील ग्राहकांना शनिवारपासून गोकुळ दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

७० कोटींची तूट भरून काढण्यासाठी दरवाढ

गोकुळ दूध संघासमोर आर्थिक तूट भरून काढण्याचे आव्हानही आहे. दूध संघावर सुमारे ७० कोटी रुपयांची तूट असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त चेअरमन आणि संचालक मंडळाने दूध विक्रीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. विक्रीदरात वाढ केल्यामुळे संघाच्या आर्थिक गणिताला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती खर्चावर होणार आहे.

शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपयांचा दिलासा

गोकुळने घेतलेल्या निर्णयानुसार, म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपयांची वाढ केली असली तरी दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३ रुपये अधिक मिळणार आहेत. म्हणजेच म्हशीचे दूध संघाला पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. गाईच्या दूध खरेदी दरातही प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गाईचे दूध उत्पादक आणि म्हशीचे दूध उत्पादक अशा दोन्ही घटकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

लिफ्टच्या नियमांचे दरवाजे किलकिले

आजचे राशिभविष्य, २० नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Afghan Jalebi Recipe : 'अफगान जलेबी' हे गाणं ऐकलंय, पण ही जिलेबी कधी खाल्लीय का? घरीच बनवा कुरकुरीत जिलेबी