सरकारी रुग्णालयांसाठी स्टार रेटिंग प्रणाली; सेवेच्या गुणवत्तेनुसार मिळणार ० ते ५ स्टार 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

सरकारी रुग्णालयांसाठी स्टार रेटिंग प्रणाली; सेवेच्या गुणवत्तेनुसार मिळणार ० ते ५ स्टार

सरकारी रुग्णालय म्हणजे अस्वच्छता, मोठ्या संख्येने रुग्ण, अपुरे डॉक्टर असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असते.

Swapnil S

मुंबई : सरकारी रुग्णालय म्हणजे अस्वच्छता, मोठ्या संख्येने रुग्ण, अपुरे डॉक्टर असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असते. त्यामुळे रुग्ण खासगी रुग्णालयात जाण्याचा मार्ग निवडतात. आता राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील सरकारी रुग्णालयांच्या सेवेचा दर्जा अधिक सक्षम, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने रुग्णालयांना 'स्टार रेटिंग प्रणाली' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार ग्रामीण रुग्णालयांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या रुग्णालयांना त्यांच्या कामगिरीनुसार ० ते ५ स्टार पर्यंत सार्वजनिक गुणवत्ता मानांकन दिले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

प्रत्येक निकषासाठी अर्धा स्टार देण्यात येईल आणि सर्व निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला पाच स्टार मानांकन मिळेल, तर कोणतेही निकष पूर्ण न केलेल्या रुग्णालयाला शून्य स्टार मानांकन प्राप्त होईल.

रुग्णालयांच्या कामकाजाची भौतिक तपासणी आणि डेटाबेसच्या आधारे दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट महिन्यात दोन वेळा मूल्यांकन होईल. चार किंवा त्यापेक्षा अधिक स्टार मिळविणाऱ्या रुग्णालयांना विशेष गौरवापर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या व्यवस्थेत ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य आणि स्त्री रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, अतिविशेष उपचार रुग्णालये तसेच राज्य कामगार विमा रुग्णालये अशा एकूण ६२३ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

या स्टार रेटिंग प्रणालीमुळे सरकारी रुग्णालयांमधील स्पर्धात्मकता वाढेल, सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होईल आणि नागरिकांना रुग्णालयांच्या कामगिरीची पारदर्शक माहिती उपलब्ध होईल, असा विश्वास राज्य सरकारला आहे.

सर्वसाधारणपणे आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या व्यक्ती सरकारी रुग्णालयात दाखल होत असतात.

व्यापक मूल्यमापन करणार

सरकारी रुग्णालयातील सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळावी यासाठी ही नवीन प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीअंतर्गत रुग्णालयांचे मूल्यांकन सेवेची उपलब्धता, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आवश्यक औषधांचा साठा, निदान चाचण्या, बाह्यरुग्ण विभाग, खाटांचा वापर, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता आणि रुग्णांचा अभिप्राय अशा दहा निकषांवर रेटिंग केले जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू