महाराष्ट्र

नवरदेवाच्या रिकाम्या कारला आग ; जीवितहानी नाही

या दुर्घटनेत जीवितहानी न झाल्याने स्थानिक लोकांनी आणि बघ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला; मात्र कार जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले

Swapnil S

कराड : साताऱ्यातील माण तालुक्यातील अक्षदा सुरू असतानाच नवरदेवाला घेऊन आल्यानंतर बाजूला उभ्या केलेल्या सजवलेल्या एर्टीगा कारने अचानक पेट घेतला; मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कार ७० टक्के जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी झाली.

 दहिवडी येथील गोंदवले रोडनजीक चैतन्य पाणपोईच्या पुढील बाजूस असलेल्या एका मंगल कार्यालयात चव्हाण -जाधव परिवाराच्या विवाह सोहळ्यासाठी नवरदेव घेऊन आलेली एर्टीगा कार ही गाडी लग्न ठिकाणाहून सुमारे १००ते १५० मीटर अंतरावर उभी केली होती. लग्नापूर्वी नवरदेव देवदर्शन करून आल्यानंतर गाडी बाजूला उभी केली असल्याने गाडीत असणारे सर्व लोक कारमधून उतरून ते लग्न समारभाच्या ठिकाणी गेले आणि मंगलाष्टके सुरू झाल्यावर एक दोन अक्षदा सुरू असतानाच कारने अचानकच पेट घेतल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. स्थानिक लोक आणि युवकांनी धावपळ करत बादल्या भरून आणलेले पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या डाळिंबाच्या बागेत असणारे बोअर चालू करून पाणी मारत आग विझवली.                

या दुर्घटनेत जीवितहानी न झाल्याने स्थानिक लोकांनी आणि बघ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला; मात्र कार जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन  जळलेल्या गाडीचा पंचनामा केला. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश