महाराष्ट्र

"गुजरात महाराष्ट्राच्या पुढं जातोय..." महायुती सरकारला ठाकरेंनी दाखवला आरसा; 'लाडकी बहीण'प्रमाणेच 'लाडका भाऊ' सुरु करण्याचीही मागणी

महिला-पुरुष भेद करू नका, लाडकी लेक, लाडकी बहिणप्रमाणे लाडका पुत्र, लाडका भाऊ योजनाही काढा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Suraj Sakunde

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा २०२३-२४ वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महायुती सरकारच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, महिला, युवक, वारकरी तसेच समाजातील सर्व घटकांसाठी विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले. महिला-पुरुष भेद करू नका, लाडकी लेक, लाडकी बहिणप्रमाणे लाडका पुत्र, लाडका भाऊ योजनाही काढा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, "लाडकी बहीण, लाडकी लेक ही योजना तुम्ही आणत असाल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. यानिमित्तानं एक गोष्ट मला बरी वाटली की, घराणेशाहीबद्दल बोलणारे लेकींची काळजी घेऊ लागले. लेकींची जशी काळजी घेतायत, तशी स्वतःच्या लेकासोबतच जनतेच्या लेकांचीसुद्धा घ्यावी. महिला-पुरुष असा भेदभान न करता, लाडकी बहीण, लाडकी लेक प्रमाणेच मुलांसाठीही लाडका मुलगा, लाडका भाऊ हीसुद्धा योजना त्यांनी आणावी. निवडणूकीच्या तोंडावर हा गाजर संकल्प आहे. निवडणूकीपुरती ही योजना मर्यादित राहू नये. आजही लाखो तरूणांचे लोंढे नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अशा आपल्या मुलांना लाडकी लेक, लाडकी बहिण उत्तर काय देणार...त्यामुळं दोघांच्या कर्तबगारीला वाव मिळाला पाहिजे. रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत."

गुजरात महाराष्ट्राच्या पुढं जातोय....

"आम्ही जनतेच्या हितासाठी बोलत आहोत. गुजरात महाराष्ट्राच्या पुढं जातोय. गुजरात पुढं जातोय, याची पोटदुखी नाही, पण महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेतायत, हे आता दिसतंय. येणाऱ्या निवडणूकीत जनता त्यांना जागा दाखवेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत