(Photo-X/@harshsapkal)
महाराष्ट्र

जीभ कापा, पण भाजपला उघडे पाडणारच! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

देशातील दोन मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही.

Swapnil S

मुंबई : देशातील दोन मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी उघडे पाडतो म्हणून माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही. भाजपचा पर्दाफाश करतच राहणार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी दिला.

भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्याला १० लाख तर तोंडाला काळे फासणाऱ्याला २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भाजप आमदाराच्या या घोषणेला सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले. “माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल आणि चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा,” असे थेट चॅलेंज सपकाळ यांनी दिले आहे.

टिपू सुलतानाचे वंशज भाजपमध्ये आल्यास मोठी पदे मिळतील

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांमध्ये स्टेजच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानाचे चित्र लावलेले दिसते, असे माझे निरीक्षण आहे. राजकीय सोयीनुसार भूमिका बदलण्याचे हे उदाहरण आहे. भविष्यात टिपू सुलतानांचे वंशज भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांनाही मोठी पदे दिली जातील, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा