महाराष्ट्र

नितीन गडकरींची नागपूरमधून हॅटट्रिक, मतफरक मात्र घटला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.

Swapnil S

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.

मतमोजणीच्या २० फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे यांना मिळालेल्या ५,१७,४२४ मतांविरुद्ध गडकरींना ६,५५,०२७ मते मिळाली.

बसपाचे उमेदवार योगेश लांजेवार १९,२४२ मतांसह तिसरे राहिले, तर ५,४७४ मते नोटाला गेली. या निवडणुकीत गडकरींच्या विजयाचे अंतर ७८,३९७ इतके कमी झाले. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांचा २,१६,००० मतांनी पराभव केला होता.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरींनी नागपूरकरांचे, कार्यकर्त्यांचे आणि मित्रांचे आभार मानले. नागपूरला देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते नागपूर आणि विदर्भाच्या औद्योगिकीकरणासाठी प्राधान्याने काम करतील आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करतील, असे म्हणाले.

गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पक्ष कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले आणि म्हटले की, भारतातील जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा जनादेश दिला आहे. गेल्या दहा वर्षांत देशाने सर्व क्षेत्रांत अभूतपूर्व विकास पाहिला आणि आम्ही पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत काम करत राहू, असे ते म्हणाले.

कुटुंबीयांसह जल्लोष

गडकरींची आघाडी अभेद्य असल्याचे स्पष्ट झाल्याने ते पत्नी आणि नातवंडांसोबत हा क्षण साजरा करताना दिसले. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये गडकरींची नात आबा जिंकले (आजोबा जिंकले) म्हणताना दिसत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक