राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असला तरी काही ठिकाणी अजुनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ येते का काय म्हणून शेतकरी चिंतीत झाला आहे. अशात पुढील दोन दिवस धाराशिव शहरात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाने उस्मानाबाद जिल्ह्याती रेड अलर्ट जारी केला आहे. तर आज सरासरी ३० मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्याती रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागिरकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यंदा धारशिवमध्ये पावसाचं आगमन उशिरानं झालं आहे. अर्धा जुलै महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्याच खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता हवामान विभागाकडून धाराशिवमध्ये अतिमुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज धाराशिवमध्ये सरासरी ३० मिलीमीटर पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्पातही अत्यल्प पाणीसाठी राहीला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुसळधार पाऊस न झाल्यास धाराशिवमध्ये पिण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे.