महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार, कारण...

गणेशोत्सवापूर्वी 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तर,

प्रतिनिधी

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. यावेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातील बहुतांश चाकरमानी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या त्यांच्या मूळ गावी येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सुमारे आठवडाभर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक असते. तर, वाहनांची व अवजड वाहनांची वाढती संख्या यामुळे अनेकवेळा तासनतास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तर, गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्ग पोलिसही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाने गणेश चतुर्थीनिमित्त कोकणवासीयांच्या सोयीसाठी आणखी बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 1915 मधील तरतुदींचा वापर करून, त्या वाहनांची सुरळीत व वेळेवर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने पनवेलमधून वाळूचे ट्रक, ट्रेलर आणि वाहनांची वाहतूक करण्याबाबत जनहितार्थ आदेश जारी केला आहे. पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी सिंधुदुर्गकडे. ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे त्या वाहनांवर ही बंदी लागू होईल ज्यात ट्रक, मल्टी एक्सेल, ट्रेलर इत्यादी वाहनांना हि बंदी लागू असेल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत