(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर, विमान सेवा; दोन कंपन्यांना कंत्राट, शासन अध्यादेश जारी

राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी भाडे तत्त्वावर हेलिकॉप्टर आणि विमान घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी भाडे तत्त्वावर हेलिकॉप्टर आणि विमान घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याकरिता "साई एव्हीएशन" व "ॲरो एअरक्राफ्ट सेल्स अॅन्ड चार्टस् प्रा.लि." या दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही कंपन्यांना दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. याबाबत बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आला.

राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ये-जा करण्यासाठी हेलिकॉप्टर व विमान सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कमीत कमी दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी