ANI
महाराष्ट्र

पुण्याजवळ हेलिकॉप्टर कोसळले; कॅप्टनसह चार जण जखमी

पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात पौडजवळ पाऊस सुरू असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याने एक हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याची घटना शनिवारी घडली.

Swapnil S

पुणे/प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात पौडजवळ पाऊस सुरू असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याने एक हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात हेलिकॉप्टरच्या कॅप्टनसह चार जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या अपघातात जखमी झालेले कॅप्टन आनंद तसेच दिर भाटिया, अमिरदिप सिंग, एस. पी. राम या चौघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे हेलिकॉप्टर ‘एडब्ल्यू १३९’ जातीचे असून ते मुंबईतील ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे आहे.

शनिवारी मुंबई येथून ते विजयवाडा येथे जात होते आणि हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टनसह तीन प्रवासी प्रवास करत होते. पौड परिसरात शनिवारी पाऊस सुरु असताना संबंधित खासगी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे ते पौड परिसरातील कोंढवळे या गावाच्या शेतात झाडावर कोसळले. त्यामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याचे पाहताच, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टर कोसळल्याने जखमी झालेले प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांना नागरिकांनी चादर, बाजमध्ये टाकून तातडीने रुग्णालयात नेले.

घटनेची माहिती मिळताच, पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत घटनेचा पंचनामा केला. नेमका हेलिकॉप्टरचा अपघात कशामुळे झाला, याबाबतची स्पष्टता अद्याप झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी