महाराष्ट्र

रवींद्र वायकर यांना हायकोर्टाचे समन्स; खासदारकीला आव्हान देणारी याचिका

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने रवींद्र वायकर यांच्यासह अन्य प्रतिवादींना समन्स बजावून २ सप्टेंबरला म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या वतीने ॲॅड. अमित कारंडे यांनी उच्च न्यायालयात रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी ॲॅड. अमित कारंडे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयालाच जोरदार आक्षेप घेतला. अमोल कीर्तीकर हे ईव्हीएम मतांच्या मोजणीनंतर एका मताने विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती