महाराष्ट्र

तीन कंपन्यांच्या आता नंबर प्लेट; वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवणे बंधनकारक

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये छेडछाड तसेच गुन्हे रोखण्यासाठी आता उच्च सुरक्षा असलेल्या नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाने तीन कंपन्यांची नेमणूक केली असून अन्य कुठल्याही कंपनीकडून बसवण्यात आलेली नंबर प्लेट ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच १ एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

परिवहन विभागाचे आवाहन

नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावट रोखणे, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबरप्लेट महत्वाची आहे. संबंधित सर्व वाहनमालकांनी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटा बेसमध्ये होऊ शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. याविषयी काही अडचण, तक्रार किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल