महाराष्ट्र

पुन्हा एकदा पेपरफुटी; बारावीचा गणिताचा पेपर फुटला, सभागृहात अजित पवार आक्रमक

कॉपीयुक्त अभियान सुरु असताना देखील पेपरफुटीचे प्रकार सुरूच असल्याने चिंतेचे वातावरण

प्रतिनिधी

आजपासून दहावीचा पेपर सुरु झाला असून बारावीचे पेपरदेखील सुरु आहेत. अशामध्ये राज्यसरकारने कॉपीमुक्त अभियान राबिवले असतानादेखील पेपरफुटीचे प्रकरण होत आहेत. आज बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. बुलढाण्यामध्ये हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला याबाबत जाब विचारला. ते म्हणाले, "हे सरकार झोपले आहे का?" असे म्हणत टीका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणामधील सिंदखेडराजामध्ये सकाळी १०.३० वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, एचएससी बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी पेपर फुटीची चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, विरोधीपक्षनेते अजित पवार विधानसभेत म्हणाले की, "हे सरकार झोपले आहे का? यामुळे बारावीच्या मुलांचे नुकसान होते." असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला जाब विचारला.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल