महाराष्ट्र

ठाणे हादरले! डोक्यात बॅट घालून पतीने पत्नीसह दोन चिमुरड्यांना संपवले

अमितच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नी भानवा अमितला सोडून त्याचा भाऊ विकाससोबत राहत होती. या कारणाने त्यांच्यात वारंवार बांडण देखील होत होते.यामुळे अमितने पत्नी भावना(२४) सह आठ वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाच्या मुलीला संपवल्याचे सांगितले जात आहे.

Swapnil S

ठाणे जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील कासारवाडी येथे एकाने डोक्यात क्रिकेटची बॅट घालून पत्नीसह दोन लहान मुलांची निर्घूण हत्या केली आहे. अमित धर्मबीर बागडी असे आरोपी पतीचे नाव असून पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर तेथून पळ काढला. याप्रकरणी जयवंत निवृत्ती शिंगे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोपी अमित बागडी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर येथील रहिवासी असून तो ३-४ दिवसांपासून ठाण्यात भावाकडे राहत होता. अमित हा कोणताही उद्योग व्यवसाय करत नव्हता, तसेच त्याला दारुचे देखील व्यसन होते. अमितच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नी भानवा अमितला सोडून त्याचा भाऊ विकाससोबत राहत होती. या कारणाने त्यांच्यात वारंवार बांडण देखील होत होते.यामुळे अमितने पत्नी भावना(२४) सह आठ वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाच्या मुलीला संपवल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत भावना ही आपल्या सख्या दीर विकास सोबत आपल्या दोन्ही मुलांसोबत राहत होती. गेल्या ३-४ दिवसांपासून आरोपी अमित हा पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी भावाकडे आला होता. आज सकाळी विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाऊसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्याच्यानंतर साधारण साडे अकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावना आणि दोन्ही मुले मृत अवस्थेत आढळून आले.तसेच त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट देखील दिसून आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल