महाराष्ट्र

मशिदीवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई; राज्य सरकारची मलमपट्टी, अवमान याचिका निकाली

राज्यातील मशिदींवरील बेकायदा भोंग्यांविरोधात कारवाईचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारने मलमपट्टी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Swapnil S

मुंबई : राज्यातील मशिदींवरील बेकायदा भोंग्यांविरोधात कारवाईचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारने मलमपट्टी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर कठोर कारवाई सुरू करून राज्य सरकारने एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यांच्या देखरेखीखाली ४९ कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मंगळवारी न्यायालयात दिली. याची मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दखल घेतली. याचिकाकर्त्यांना यापुढेही काही तक्रारी अथवा कारवाईवर आक्षेप असेल तर त्यांनी संबंधित नोडल ऑफिसरकडे संपर्क साधावा, असे निर्देश देत यासंबंधीची अवमान याचिका निकाली काढली.

राज्य सरकारची कबुली

हायकोर्टाने २०१६ मध्ये दिलेल्या निर्णयाचे पालन करण्यासाठी प्रशासनाच्या अनेक विभागांनी विविध उपाययोजना केल्या, मात्र तरीही निर्णयाची अंमलबजावणी करण्यास कमी पडलो. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अशी कारणे देताना राज्यात धार्मिक स्थळांवर २ हजार ९४० बेकायदेशीर भोंगे होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत