ANI
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आता 'शिंदेशाही'च ; १६४ मतांनी विश्वास ठराव

आणखी दोन आमदार शिंदे गटात गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे कॅम्पमध्ये अवघे १४ आमदार उरले असून, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते

वृत्तसंस्था

अखेर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले आहे. शिंदे सरकारच्या समर्थनार्थ 164 मते पडली. उद्धव गटातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या बाजूने ९९ मते पडली. कळमनुरीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला. शिवसेनेचे लोहा येथील आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आणखी दोन आमदार शिंदे गटात गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे कॅम्पमध्ये अवघे १४ आमदार उरले असून, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गट व्हीपला शिवसेनेचा मुख्य व्हीप म्हणून मान्यता देण्याच्या कारवाईला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, नवनियुक्त सभापतींना व्हिप ओळखण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या कृतीमुळे सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणाची स्थिती बदलत आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

४० ठार, १०० जखमी; नववर्षाच्या पार्टीदरम्यानच बारमध्ये भीषण स्फोट; स्वित्झर्लंडच्या आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये मोठी दुर्घटना

एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून...

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा