महाराष्ट्र

महाराष्ट्रात उजाला योजनेला मिळाले चांगले यश ;२.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

शहरांमध्ये प्रत्येकी ८ लाखांपेक्षा अधिक एलईडी ट्यूब/बल्ब वितरीत करण्यात आले आहेत.

वृत्तसंस्था

महाराष्ट्रात उजाला योजनेच्या अंमलबजावणीत चांगले यश मिळाले आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. यात पुणे (शहर) परिसराबरोबरच मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विक्रमी एलईडी ट्यूब/बल्ब यांचे वितरण करण्यात आले आहे. पुणे शहर विभागात ३०,४९,३६९, मुंबई विभाग-१०,००,८९४, कोल्हापूर १२,४८,२७० असे एलईडी ट्यूब/बल्ब वितरीत करण्यात आले आहेत. याशिवाय औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती या राज्याच्या विविध विभागांमधील शहरांमध्ये प्रत्येकी ८ लाखांपेक्षा अधिक एलईडी ट्यूब/बल्ब वितरीत करण्यात आले आहेत. राज्यात वितरित करण्यात आलेल्या एलईडी ट्यूबलाईटची संख्या ५,३१,१३३ एवढी तर एलईडी पंख्यांची संख्या१,८६,२११ एवढी आहे.

ऊर्जा बचत, कार्बन उत्सर्जन टाळणे, ग्राहकांचे वीज बिल कमी होणे हे एलईडी वापराचे दृश्य परिणाम दिसून आले आहेत. तसेच सर्वांसाठी ऊर्जा हे लक्ष्य यामुळे साध्य झाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील वीज बिलांमध्ये अंदाजे १९ हजार कोटी रुपयांची आणि महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १,१४० कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.

उजाला योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर देशातील एलईडी बल्बच्या किमतीही कमी झाल्या आहेत. यापूर्वी ३००-३५० रुपये किंमतीला असलेला एलईडी बल्ब आता ७०-८० रुपयांमध्ये मिळत आहे. या योजनेंतर्गत एलईडी बल्ब वितरीत करण्यात आल्यामुळे ऊर्जेची वार्षिक बचत झाली आहे, यामुळे राज्यातील अनेक कुटुंबांचे वीज बिल कमी झाले आहे.म

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक