महाराष्ट्र

रामराजे नाईक निंबाळकरांच्या भावांच्या घरांवर आयकर छापे; धाडीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा

विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानांवर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानांवर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणसोबतच पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवरही कारवाई झाल्याची माहिती आहे.

गोविंद दूध कंपनीतील व्यवहारासंदर्भात आयकर विभागाकडून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर सकाळी सहापासून चौकशी करीत आहे. बंगल्यात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. खरेतर या कारवाईमागचे आयकर विभागाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

धाडीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा

रामराजे नाईक निंबाळकर हे तांत्रिकदृष्ट्या अजित पवारांसोबत असले तरी विधानसभा निवडणुकीत ते कुठेच दिसले नाहीत. त्यांनी बाहेर पडून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही. पण, विधानसभेला दीपक चव्हाणांसाठी बैठका घेतल्या अन छुपा पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. तर लोकसभेला रामराजेंनी उघड उघड धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दिला होता. आता रामराजेसुद्धा पवारांसोबत जातील अशा चर्चा होत्या. त्यासंदर्भात सूचक वक्तव्य खुद्द शरद पवारांनी इंदापूरमध्ये केले होते. यामुळे या धाडीमागे राजकीय कनेक्शन आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश