महाराष्ट्र

साहित्य, संस्कृती मंडळांच्या अध्यक्षांच्या मानधनात वाढ; महिना ५० हजार रुपये मिळणार मानधन

मराठी भाषा विभाग स्वतंत्र प्रशासकीय विभाग झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या मंडळाच्या अध्यक्षांच्या मानधनात विशेष बाब म्हणून वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मराठी भाषा विभाग स्वतंत्र प्रशासकीय विभाग झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या मंडळाच्या अध्यक्षांच्या मानधनात विशेष बाब म्हणून वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांना महिना ५० हजार रुपये, तर भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष यांना महिना ५० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे कार्यालय सांस्कृतिक विभागाच्या अखत्यारित होते. मराठी भाषा विभाग हा स्वतंत्र प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे कार्यालय मराठी भाषा विभागाकडे वर्ग झाले. मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ ही शासकीय कार्यालये असून सदर कार्यालयाच्या संबंधित अध्यक्षांचे मानधन एकसमान असणे आवश्यक आहे.

विशेष बाब म्हणून मंजुरी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे मानधन दरमहा १० हजारांवरून दरमहा ५० हजार रुपये इतके, तसेच अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, भाषा संचालनालय, मुंबई यांचे मानधन दरमहा ७५०० वरून दरमहा ५० हजार रुपये इतके वाढवून देण्यास एक विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येत आहे. तसेच आदेश शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील, असे राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल