महाराष्ट्र

शास्त्रज्ञांच्या कामगिरीमुळे भारत आत्मनिर्भर ; केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांचा विश्वास

प्रतिनिधी

कराड : हवामान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून चांगले यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर हवामान विभागात भारत आत्मनिर्भर झाला आहे. शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात असल्याचा विश्वास केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी महाबळेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.यावेळी शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीवूरल उपस्थित होते.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू हे दोन दिवशीय सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता गुरुवारी त्यांनी महाबळेश्वर येथील हवामान विभागाच्या ढंग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी केली.या भेटीनंतर महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ना. रिजिजू म्हणाले,शास्त्रज्ञांनी हवामान संशोधनात केलेल्या कामामुळे देशातील मच्छीमार व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. पूर्वी ढंगांच्या संशोधनासाठी विमानाची मदत घ्यावी लागत होती. परंतु महाबळेश्वरला मिळालेल्या नैसर्गिक उंचीमुळे येथे ढंग संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यासाठी आता विमानाची मदत घावी लागत नाही. तसेच ढग फुटी, महापूर व दरड कोसळून होणाऱ्या आपत्तीची माहिती अगोदर मिळविण्यात अपयश येत आहे. भविष्यात या संदर्भात अधिकचे संशोधन करण्याची गरज आहे. महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजचे आहेत, महाबळेश्वर पाहण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य असून, महाबळेश्वर ज्यांनी पाहिले नाही, हे त्यांचे दुर्भाग्य असल्याचे मंत्री रिजिजू यांनी सांगत महाबळेश्वरच्या पर्यटन स्थळाचे कौतुक केले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल