९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील वादानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून त्यात दोशी यांचा समावेश आहे.

Swapnil S

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने सोमवारी राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या आदेशात दोशी यांचा समावेश आहे.

दोशी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची बदली साताराचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोशी यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

बदली झालेले पोलीस अधिकारी

संदीप घुगे : पोलीस अधीक्षक, सांगली - पोलीस उपायुक्त, सुरक्षा राज्य गुप्तवार्ता, मुंबई

योगेश गुप्ता : पोलीस अधीक्षक, कोल्हापूर - पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र

निलोत्पल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली - पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

महेश्वर रेड्डी : पोलीस अधीक्षक, जळगाव - पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

श्रीकांत ढिवरे : पोलीस अधीक्षक, धुळे - पोलीस अधीक्षक, जळगाव

राजकुमार शिंदे : पोलीस उपायुक्त, पुणे - पोलीस अधीक्षक, वाशिम

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय