महाराष्ट्र

राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची - डॉ. सुभाष दळवी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या २६ मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : “मतदान करा, जागरूक नागरिक बना...” या अंगणवाडी महिलांनी दिलेल्या घोषणांनी सभागृह दुमदुमले.... निमित्त होते स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जागृतीसंदर्भात कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे. कुर्ला येथील बंटारा सभागृहात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी सकारात्मकरित्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी एक विशेष प्रशिक्षणद्वारे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आखाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर, बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज पाटणकर, समाज विकास अधिकारी नितीन घरत, डॉ. पूजा देसाई, व्यासपीठावर उपस्थित होते.

“देशात भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च महोत्सव सुरू झाला असून, निवडणुकीत एका मतालादेखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे ‘मतदानाचा उत्सव पर्व, देशाचा आहे गर्व’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आग्रही असणे गरजेचे आहे. शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी मतदान होते. त्यामुळे शहरी भागातील मतदानाबद्दलची उदासीनता दूर करून मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, जेणेकरून एक सक्षम लोकशाही निर्माण होण्यास मदत होईल,” असे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या २६ मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून १७४- कुर्ला विधानसभा मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे बंटारा भवन येथे आयोजन करण्यात आले होते.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश