जयपूरजवळ भीषण अपघातात नाशिकमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २५ जखमी X| 'पीटीआय'च्या व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट
महाराष्ट्र

जयपूरजवळ भीषण अपघातात नाशिकमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २५ जखमी

राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.

Swapnil S

लासलगाव : राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. बगरू पुलाजवळ शनिवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ भाविक जखमी झाले. त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मगर कुटुंबातील २८ भाविक १९ तारखेला धार्मिक यात्रेसाठी राजस्थानला रवाना झाले होते. खाटू श्याम बाबा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ते सावरियासेठ मंदिराकडे जात असताना रात्री पावणे दोनच्या सुमारास बगरू पुलाजवळ हा अपघात झाला. भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सने ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

या अपघातात सेवानिवृत्त कृषी अधिकारी दीपक त्र्यंबकसिंग मगर (६५), संदीप रामसिंग मगर (५५) आणि महेश विजयसिंग मगर (४५) या तिघांचा मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह रविवारी सकाळी अजमेर सौंदाणे येथे आणण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. किरकोळ जखमींना घरी पाठविण्यात आले असून, सात गंभीर जखमींवर जयपूर येथील मानसिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

राहुल गांधी यांचा १ नोव्हेंबरला 'चलो दिल्ली'चा नारा

Mumbai: भगवती रुग्णालयाचा कारभार खासगी संस्थेकडे; ४९० खाटांसाठी निविदा प्रक्रिया, ५० टक्के खाटा पालिका रुग्णांसाठी राखीव

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड सरकारपुढे जास्तच नम्र राहिले; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. के. कौल यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय विमानांचे नवी मुंबईतून उड्डाण; मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या पुनर्विकासामुळे IndiGo, Air India ची सज्जता