जळगावात रोज ३५ हजार किलो लाकडांची विक्री; गोवऱ्यांची विक्रीही वाढली 
महाराष्ट्र

जळगावात रोज ३५ हजार किलो लाकडांची विक्री; गोवऱ्यांची विक्रीही वाढली

इराण-अमेरिका युध्दाचा फटका हा व्यावसायिक आणि घरघुती गॅस सिलिंडर वितरणाला बसला आहे. गॅस टंचाई अभावी हॉटेल चालक आणि सामान्य नागरिक हा पारंपारिक चुलीकडे वळला आहे.परिणामत: शहरात सरपणाच्या लाकडाची मोठया प्रमाणावर मागणी आलेली आहे. पूर्वी दररोज ३००० किलो विकले जाणारे हे सरपण आता दररोज ३५ हजार किलो विकले जात आहे. पाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गोवऱ्यांची मागणी वाढली आहे.

Swapnil S

जळगाव : इराण-अमेरिका युध्दाचा फटका हा व्यावसायिक आणि घरघुती गॅस सिलिंडर वितरणाला बसला आहे. गॅस टंचाई अभावी हॉटेल चालक आणि सामान्य नागरिक हा पारंपारिक चुलीकडे वळला आहे.परिणामत: शहरात सरपणाच्या लाकडाची मोठया प्रमाणावर मागणी आलेली आहे. पूर्वी दररोज ३००० किलो विकले जाणारे हे सरपण आता दररोज ३५ हजार किलो विकले जात आहे. पाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गोवऱ्यांची मागणी वाढली आहे.

व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई ही शहरात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी पर्याय शोधला आहे. हॉटेल, खानावळी आणि सामान्यांच्या घरात चुली पेटायला लागल्या आहेत.

या मातीच्या चुलींना मागणी आलेली आहे. या गॅस टंचाईमुळे सरपणाचा मोठा साठा करण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे. लाकडाच्या वखारीतून लाकडाला मोठी मागणी असल्याचे सांगण्यात येते.

या वखारींमध्ये लाकडाचा पुरेसा साठा असल्याचे वखार मालकांकडून सांगण्यात आले. दहा दिवसांपूर्वी वखारीतून दररोज तीन हजार किलो लाकडाची विक्री होत असे. आता गॅस टंचाईने अचानक मागणी वाढून ती दररोज ३५ हजार किलोपर्यंत गेलेली आहे. अनेक नागरिक लाकडा ऐवजी गोवरीचा वापर करण्यास पसंती दिली आहे. एक गोवरी ही ३० मिनिटे जळते. पाच ते सहा गोवऱ्यावर चार माणसांचा स्वयंपाक होतो. आज शहरात हजार ते १५०० गोवऱ्यांची दररोज विक्री होत आहे .

जळगाव शहरात वरण बट्टीची मोठया प्रमाणावर विक्री होते. रेडिमेड वरण बट्टी विकणारी पन्नासवर दुकाने आहेत. गॅस पुरवठा होत नसल्याने या व्यावसायिकांनी काकडाच्या भट्टीचा आधार घेतला आहे. काहींनी थेट रस्त्यावर भटटया लावल्या आहेत. या

लाकडाच्या भट्टीत बट्टी वाफवली जात आहे. विशेष म्हणजे गॅस वरील तयाार होणाऱ्या बट्टीपेक्षा लाकडाच्या चुलीवरील बट्टीला अधिक पसंती मिळत आहे.

गॅस अभावी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलमधील मेनूत बदल केला आहे. जास्त गॅस लागणारे पदार्थ बनवणे सध्या बंद केले आहे. यात चायनिज, उतप्पा, डोसा, पराठे यांचा समावेश असून त्या ऐवजी पोहे, मिसळ, उपमा, इडली सांबार मेनूकार्डवर दिसत आहेत.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी